सचिन कोकितकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कडोली केंद्रांतर्गत सरकारी उच्च प्राथमिक शाळा बंबरगे ता. जि. बेळगाव येथील अध्यापक व कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे सुपुत्र यशवंत उर्फ सचिन दत्तात्रय कोकितकर यांना कर्नाटक राज्यातील मराठा शिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच बेळगाव येथे प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य, शैक्षणिक सेवेतील त्यांची उपक्रमशीलता, सामाजिक जाणिवेतून केलेले समाजकार्य, अभ्यासुवृत्ती, पालक व विद्यार्थी प्रिय म्हणून असलेली त्यांची ओळख या सर्व गोष्टींची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेऊन त्यांना सरकारी मराठा शिक्षक कल्याण संघ बेळगाव ग्रामीण यांच्यावतीने 'आदर्श गुरु' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालय बेळगाव येथे रविवार दि. 24 /11 /2024 रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बेळगावचे डी.डी.पीआय लिलावती हिरेमठ, प्रमुख वक्ते राणी चन्नमा विश्वविद्यालयचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद गायकवाड, केंद्रीय विद्यालयाचे निवृत प्राचार्य शिवाजीराव केदनूरकर, बेळगांव ग्रामीणचे BEO, एस पी दासपन्नवर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत गौरव समिती अध्यक्ष शेखर करंबळकर यांनी केले. प्रास्ताविक मराठा शिक्षक कल्याण संघ अध्यक्ष विनायक पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा निलजकर, नामदेव कानशिडे आदी पदाधिकारी व संचालक यांनी परिश्रम घेतले.
यशवंत उर्फ सचिन कोकितकर यांच्यासह चंदगड तालुक्यातील मोतीराम कुरिस, गोविंद एस गावडे (उच्च प्राथमिक शाळा कुद्रेमानी) यांनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर आदर्श शाळा पुरस्कार आंबेवाडी (ता. बेळगाव) शाळेला प्रदान करण्यात आला.
No comments:
Post a Comment