सदाशिव गोविंद मालुसरे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे व पारगडचे पहिले किल्लेदार रायबा मालुसरे यांचे बारावे वंशज मुळगाव किल्ले पारगड सध्या राहणार मालुसरेवाडी- पार्ले (ता. चंदगड) येथील रहिवाशी सदाशिव गोविंद मालुसरे वय ६९, यांचे रविवार दि. २४/११/२०२४ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
सदाशिव यांच्या काकी श्रीमती मनोरमा सिताराम मालुसरे वय ९० यांचे दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचे दिवस कार्य बुधवार दि. २७ रोजी होते. त्या तयारीच्या घाईत असतानाच सदाशिव यांचे निधन झाले. काकी व पुतण्या यांचे दहा दिवसाच्या आत निधन झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment