प्रातिनिधिक छायाचित्र |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) ते हेमरस साखर कारखाना मार्गावरील पत्रीबन बसवेश्वर मंदिर येथे आज दि. २४/११/२०२४ रोजी दुपारी २ वाजता धाडसी चोरीचा प्रकार घडला. याबाबत मंदिर चे पुजारी धोंडीबा गुंडकली मुळगाव तिरमाळ सध्या राहणार राजगोळी बुद्रुक यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
कळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी राजगोळी बुद्रुक गावाच्या हद्दीतील या मंदिराची कडी काढून मंदिरात प्रवेश केला. यापैकी हातात तलवारी घेतलेल्या दोघांनी मंदिराचे पुजारी धोंडीबा बसाप्पा गुंडकली यांना तलवारीच्या धाक दाखवत 'अगर चिल्लाया तो काटके रखेंगे' असे दरडाऊन गळ्यावर तलवारी ठेवल्या. तिसऱ्या आरोपीने मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला लावलेले काढून आतील सुमारे २ लाख रुपये किमतीची चांदीची चार किलो वजनाची नंदीची मूर्ती जबरदस्तीने घेऊन बेळगावच्या दिशेने पलायन केले. यावेळी हालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुजारीच्या डोळ्याला तलवारीचे टोक लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. याबाबत चंदगड चे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील अधिक तपास करत आहेत. संशयित आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (6), 331 (4), 305 ड नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment