चंदगड / प्रतिनिधी
म्हाळुंगे खा (ता. चंदगड) इको केन शुगर एनर्जी लिमिटेड कारखान्याचा पहिल्या साखर पोती पूजन कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. हंगाम सन २०२४ - २५ हंगामासाठी कारखान्याने साडेचार लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना भागातील शेतकऱ्यांचा शेवटच्या उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना चालू ठेवणार आहेत. यावेळी कोल्हापुर जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँकेचे स्थायी कोठार नियंत्रक भगवंत किरामटे उपस्थित होते .
"भागातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी खूप प्रेम केलेले आहे. यामुळे मागील प्रत्येक हंगामात उचांकी गाळपाचा विक्रम कारखान्याने केलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या जोरावर कारखाना उचांकी असे साडेचार लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे. कारखान्याचा यावर्षीचा गाळप हंगाम लवकरच सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात तोडणी व वाहतुक यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत असून तालुक्यातील प्रत्येक भागात तोडणी व वाहतूक यंत्रणा काम करील असा विश्वास सतीश अनगोळकर यांनी व्यक्त केला."
मागील हंगामात झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून तसेच भविष्यात कोणताही तांत्रिक अडचण येऊ नयेत, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. यावेळी आर्थिक सहाय्य केले बदल कोल्हापूर जिल्हा मद्यावर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संचलक मंडळ सी इ सो सीएम ए सेल चे व्यवस्थापक व इन्स्पेक्टर यांचे आभार कारखान्यांचे सतीश अनगोळकर यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर, जनरल मॅनेजर सुनील पाटील, डी जीएम एच आर प्रभाकर रावल, असिस्टंट जीएम मारुती चव्हाण, चीफ केमिस्ट मनोज सखिया, एच आर मॅनेजर सचिन पाटील उप शेती अधिकारी शशिकांत थोरवत गोडाऊन किपर पांडुरंग पाटील मॅनेजर बाबासाहेब देसाई हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment