कुदनुर येथील दुर्गादेवी मंदिरातून १ लाख ८० हजाराच्या दागिन्याची चोरी, अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा नोंद - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2024

कुदनुर येथील दुर्गादेवी मंदिरातून १ लाख ८० हजाराच्या दागिन्याची चोरी, अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा नोंद



चंदगड / प्रतिनिधी
        कुदनुर (ता. चंदगड) येथील दुर्गादेवी मंदिरातून १ लाख ८० हजार रुपयांच्या सोने व चांदीच्या दागिण्यांची चोरी झाली आहे. याबाबतची फिर्याद शंकर हणमंत वडर (रा. वडरवाडा कुदनुर, ता. चंदगड) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. ही घटना रविवार (ता. १०) नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेसात ते सोमवार (ता. ११) नोव्हेंबर २०२४ च्या सकाळी सहाच्या दरम्यान मुदतीत घडली आहे.
     या संदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, कुदनुर येथील दुर्गादेवी मंदिराचे समोरील मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्याचे गेटचे कुलुप तोडून गाभाऱ्यात असलेल्या दुर्गा देवीच्या मंदिरातील अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बोरमाला ६० हजार रुपये किंमतीच्या, ५० तोळे चांदीच्या वजनाचे देवीचे दोन मुकुट ६० हजार रुपये किंमतीचे, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र ३० हजार रुपयांचे व प्रत्येकी अडीच ग्रॅम वजनाचे दोन मंगळसुत्र ३० हजार रुपयांचे असे एकूण १ लाख ८० हजार रुपयांचे सोने व चांदिचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. अज्ञात चोरट्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पो. स. ई. भिंगारदेवे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment