चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड मतदारसंघात सध्या केवळ मोठ्या बड्या बड्या बाता मारण्याचं काम सुरू आहे. कुणी म्हणतंय कोट्यवधीचा निधी दिला तर कुणी धमक्या आणि दबावतंत्र वापरतंय. या सगळ्यात कुठेही चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास आणि व्हिजन दिसत नाही. केवळ कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी करून स्वतःचा विकास करण्याचं धोरण असून त्याला मूठमाती देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक उच्चशिक्षित आणि उद्योगविश्वात नाव गाजवलेला आणि दौलत कारखाना सुरळीत सुरू करून आपल्या कामाची चुणूक दाखवलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची वेळ आली आहे. तरी शेवटचे काही दिवस शिल्लक असून चंदगडच्या जनतेने भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची गरज असून मानसिंग खोराटे यांच्या नारळाची बाग या चिन्हावर प्रचंड मतदान करून निवडून द्या आहे आवाहन जगन्नाथ हुलजी यांनी केले. तुडये, तूर्केवाडी, हेरे भागात प्रचार दरम्यान त्यांनी पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला. यावेळी अनेक कार्यकर्ते, शेतकरी, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चंदगड तालुक्यात मागे ठेवण्याचे काम या राजकीय मंडळींनी केले आहे. खरं तर हे महाराष्ट्रात कुठेच नाही ते या चंदगडच्या मातीत आहे. इथे सुशिक्षित तरुणांची फौज आहे, निसर्गसंपन्न प्रदेश असल्याने अनेक चांगली पर्यटन स्थळे आहेत, माळरानावर भली मोठी एम.आय.डी.सी.आहे. मात्र इथे उद्योग आणण्यात इथले नेतृत्व अपयशी ठरले आहे. या ज्या वेगाने विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. केवळ राजकारण करणे आणि आर्थिक फायदा करून घेणे एवढच काम केलं आहे. त्यामुळे आता बदल करणं गरजेचं आहे. भागाचा विकास करून तरुणाच्या हाताला काम द्यायचं असेल तर योग्य निर्णय घ्या. बदल हवा ते आमदार नाव या संकल्पाला साथ देऊन खऱ्या अर्थाने चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केले.
उद्योग व रोजगाराला प्राधान्य
आज चंदगड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. शिक्षण आहे पण हाताला काम नाही अशी अरिस्थिती आहे. महिला भगिनींना तर रोजगाराच्या. संधीच नाहीत. त्यामुळे सर्वात आधी चांगले उद्योग, शेती प्रक्रियेला प्राधान्य देवून त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही शेती संबंधित प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आम्ही उद्योजकता मेळावा देखील घेण्याचे नियोजन आहे. या आधीही आम्ही रोजगार मेळावा घेऊन दीड हजार तरुण तरुणींना नोकरीच्या संधी दिल्या आहेत. तर महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करत आहोत असं खोराटे म्हणाले.
उद्योजकता वाढीसाठीची ब्लू प्रिंट तयार
तर भविष्यात रोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने ब्लू प्रिंट तयार असून त्यावर काम सुरू आहे. तरुणांना रोजगार कसे देणे, महिलांना लघु, कुटीर उद्योगाच्या माध्यमातून कसं सक्षम करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर उद्योजकता वाढवण्यासाठी उद्योजकता मेळावा घेणार असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment