चंदगड / प्रतिनिधी
राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार केला, पण ते निवडूनही आले. त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा होती की ते आपला व कुपेकरांचा सन्मान करतील. पण त्यांनी स्वार्थासाठी गद्दारी करुन धोका दिला. त्यांना धडा शिकविण्यासाठी तुतारीवर मतदान करून डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकरांना निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. आज चंदगड तालुक्यातील माणगाव (ता. चंदगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षसह इतर घटकांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांच्या प्रचारात आयोजित भव्य प्रचार सभेला उद्देशून ते बोलत होते.
सभेला उपस्थित जनसमुदाय. |
लाडकी बहीण योजना पण महिला सुरक्षे बाबत बोलताना ते म्हणाले, ``राज्यातील महायुती सरकार इतकी वर्षे सत्तेत असताना देखील लोकांचे काम कधी केले नाही. राज्यात लाडकी बहिणी योजना आणून पंधराशे रुपये जाहीर केले. त्याला आपला विरोध नाही. पण या लाडक्या बहिणीला व महिलांना संरक्षण कसे द्यायचे याचा विचार या सरकारने केलेला नाही. आज राज्यात स्त्रियांवर अत्याचार मुलींचे अपहरण अनेक महिलांचे जीवन उध्वस्त होत आहेत. राज्यात 6781 स्त्रियांच्या अत्याचारावरील प्रकरणे आहेत. 64 हजार मुली गायब होतात. पण याची नोंद सरकारकडे नाही. या राज्यात आमच्या मुली व महिलांना संरक्षण दिले जात नाही. ते महिलांचे व मुलींचे कल्याण काय करणार असा सवाल त्यांनी केला.``
राज्यात शेतकरी व तरुणांची अवस्था दयनीय असस्था झाली आहे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण घेतले तर नोकरी मिळत नाही. 62 लाख तरुण नोकरीच्या शोधात आहेत. दुसरीकडे शेतकरी डोक्यावरील कर्जामुळे रोज आत्महत्या करून घेत आहे.
७१ हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले :
आसमानी संकटामुळे पीक येत नाही. शेतकरी संकटात असतो. यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझं कमी करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांचे 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला होता. यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम आपण केलेले असल्याचे सांगितले. देशात मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्रातील भाजप सरकारने 400 खासदार निवडून आणण्याचे आवाहन केले होते. पण मोदी व शहांचा 400 चा डाव हाणून पाडला असल्याचे सांगितले.
उमेदवार डॉ. नंदिनी कुपेकर-बाभुळकर
संघर्षात वडिलांची कमतरता - पवार साहेबांमुळे वडील आल्याची जाणीव :
आपले वडील दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे संघर्षात नक्कीच त्यांची कमतरताच भासते. पण आजच्या सभेत सभेत शरद पवार साहेबांमुळे वडिल आल्याची जाणीव होत असल्याचे भावनिक आवाहन उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर बाबुळकर यांनी सांगितले. चंदगड मतदारसंघातील मतदारांना गद्दारांचे सरकार हवे की प्रामाणिकांचे सरकार हवे. आम्ही या भागातील जनतेसाठी 370 चे गुन्हे घेतलेले आहेत. का 302 चे गुन्हे असलेले पाहिजे हे सुज्ञ जनतेने ठरवावे असे सांगितले.
हेलिकॉप्टर हव विमान हवं :
मतदारसंघातील एका उमेदवाराला हेलिकॉप्टर किंवा विमान हवा आहे. जेणेकरून 1000 रुपये तिकीट घेऊन विमानातून किंवा हेलिकॉप्टर मधून चंदगड तालुक्यातील किल्ले व निसर्ग दाखवणार आहेत. तिकिटातून मिळालेल्या रकमेतून मतदार संघाचा विकास करणार असल्याचे सांगतात. या पैशातून विकास कधी होणार ते त्यांनाच विचारावे. हे हास्यास्पद असून दुबईत राहुन त्यांना हे उकलणार नाही असे सांगितले.
भविष्यात अनेक विकाकामे राबविण्याची इच्छा : चंदगड - आजरा मतदारसंघात 100 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय, येथील काजू व इतर शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, हॉटेल व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न, महादेव कोळी समाजाचा प्रश्न सोडवून जातीचे दाखला देण्याची सोय, यासह या परिसरात अनेक उद्योग उभारून मतदार संघातील हजारो तरुणांना रोजगार मिळवून देण्याची इच्छा आहे.
माझ्या अस्थी नदीत टाकू नको :
मतदारसंघातील प्रत्येक थेंबात मी आहे. चित्री प्रकल्पाच्या मंजुरीसाठी बाबासाहेब कुपेकरांनी शरद पवारांकडे गेले असता त्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणात त्यांनी व्हेंटिलेटरवर असताना एका कागदावर लिहिले. माझ्या निधनानंतर अस्थिंचे विसर्जन कोणत्याही नदीत करु नको, मी राबवलेल्या चित्री, येणेचवंडी व इतर पाणी योजना प्रकल्पमध्ये टाक. जेणेकरून प्रत्येक पाण्याच्या थेंबामधून मी मतदारसंघात राहीन.
महाराष्ट्राचा इतिहास निष्ठेचा पण यांनी गदारी केले :
महाराष्ट्राचा इतिहासात यशवंतराव चव्हाण यांनी कॉम्रेड दत्ता देशमुख यांना चांगली संधी देऊन बोलवले असता त्यांनी निष्ठे खातर गेले नाहीत. हा निष्ठा असलेला महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आज अनेकांनी गद्दारी केली. इडी व सीबीआय मुळे गेले. महायुती वाले म्हणतात बटेंगे तो कटिंग, हा देश समतेचा आहे. आमचा नारा जुडेंगे तो जितेंगे असा आहे. संविधान बदलण्याचा पाप आज भाजपा करीत आहे हे विसरून चालणार नाही.
गुजरातला लोटांगण घालणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना हद्दपार करा :
महायुतीने एकही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतला नाही. त्यामुळे आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. दोन लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या. महायुतीचे नेते गुजरातला लोटांगण घालत आहेत. त्यांना हद्दपार करा. महिलांना वाईट वागणूक देणाऱ्या अशा लोकांना गाढल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात गेले : विषारी प्रकल्प हलविला :
बाभुळकर म्हणाल्या आई संध्यादेवी आमदार असताना मतदारसंघातील तीनशे गावच्या कानाकोपऱ्यात फिरले. उचंगी सारख्या प्रकल्प राबविला. दोनशे कोटींचा विषारी प्रकल्प बंद केला. एव्हीएच सारख्या विषारी प्रकल्प हातभार करण्यासाठी तुरुंगात गेलो. देशाच्या इतिहासात 200 कोटी रुपयांचा चालू प्रकल्प बंद केला.
भरलेलं ताट देऊन देखील त्यांनी खंजीर खुपसले. भरलेले ताट आम्ही त्यांना दिले त्यांच्यासाठी कार्यकर्ता राबवला. पण त्यांनी एका वर्षातच परतफेड केली. त्यांनी चक्क डिजिटल वरून आई संध्यादेवींचा फोटो काढला. तसेच पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसले.
मंजूर झालेले शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र शिनोळीला नेले. मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरू ठेवले नाही. 1600 कोटींचा विकास त्यांनी केला नाही. उलट या निधीतून ठेकेदारांचा विकास केला आहे. नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेत महिला कर्मचारी नाहीत. कर्नाटकाला महाराष्ट्राचे पाणी दिले त्याचा जबाब विचारावा असे सांगितले.
खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ``नंदाताई या स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. मतदारसंघ एक नंबरवर आणण्यासाठी नंदिताईना ताकद द्या. यासाठी सर्वांनी सहकार्य करा. खंडणी व टक्केवारीची परंपरा मोडून काढायची आहे. यामुळे आपला महाराष्ट्र दुषित झालेला आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. या दृष्टीकोनातून नंदाताई योग्य उमेदवार आहेत. त्यांना चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून द्या ``
यावेळी श्रीमती संध्यादेवी कुपेकर, सुनिल शिंस्त्रे, विजय देवणे, एस. जे. पाटील, अमर चव्हाण, रियाज शमनजी, अकलाख मुजावर, विलास पाटील, अतुल दिघे, संभाजीराव देसाई शिरोलीकर, फिरोज मुल्ला, गणेश फटाक यांची भाषणे झाली.
No comments:
Post a Comment