सुराज्य निर्माण करण्यासाठी मानसिंग खोराटे यांना पाठबळ द्या, विनय कोरे यांचं आवाहन; नेसरी येथे जनसुराज्य पक्षाची मानसिंग खोराटे यांच्यासाठी रेकॉर्ड ब्रेक सभा - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2024

सुराज्य निर्माण करण्यासाठी मानसिंग खोराटे यांना पाठबळ द्या, विनय कोरे यांचं आवाहन; नेसरी येथे जनसुराज्य पक्षाची मानसिंग खोराटे यांच्यासाठी रेकॉर्ड ब्रेक सभा



नेसरी (प्रतिनिधी) :
 आज लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला नाही तर मतदाराला दिला आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा. आज तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत, त्याचाकडे पहा, सगळे कसे आहेत, कुणी आणले आहेत, का आले आहेत? त्यातून आम्ही मात्र, एका शेतकरी, कामगार घरातला, उच्चशिक्षित, उत्तम उद्योजक, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा एक उमेदवार दिला आहे. स्वतःबरोबर लोकांना घेऊन प्रगती पथावर नेणारा उमेदवार म्हणून मानसिंग खोराटे पुढे आलेले आहेत. एक चांगलं उद्देश घेऊन ते पुढे जात आहे. त्याला पाठबळ देण्याचं काम तुम्ही या मतदानातून दाखवून द्या. नेसरीच्या भुमीतूनंच आपल्याला परिवर्तन आणायचं असून सुराज्य निर्माण करायचा निर्धार करूयात. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून सुराज्य निर्माण करण्याचा हा विचार घेऊन मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन विनय कोरे यांनी केले.

नेसरी येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दीत मानसिंग खोराटे यांची जनसुराज्य पक्षाची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश शहापूरकर होते. यावेळी उमेदवार मानसिंग खोराटे, ॲड. संतोष मळविकर, मनीषा खोराटे, रमेश रिंगणे (मा. उपनगराध्यक्ष, गडहिंग्लज), आर.आय. पाटील, मार्केट शुगर कारखाना चेअरमन ज्योतिबा आंबुलकर, बाबासाहेब भेकणे, जगन्नाथ हुलजी, पांडुरंग नाना हुमटी-पाटील, रमेश आरबोळे (मा. सरपंच, मुंगळी), बसवराज आरबोळे, बी.एम. पाटील, राजवर्धन शिंदे सांबरेकर, दिनेश मुनोत, बाळासाहेब हळदणकर, बाळाराम फडके, ह.भ.प. संजय पाटील, भरमु जाधव, बाबुराव पाटील, रोहिणी मेणसे, संगीता म्हातुगडे यांचेसह कामगार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत ॲड. मळविकर यांनी केले. सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केले. 

कुठला उमेदवार कशासाठी उभा आहे एकदा बघुन घ्या

यावेळी कोरे म्हणाले, चंदगड मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत त्यात अजितदादा यांच्याकडील उमेदवार पहिला तर त्याचा कितवा पक्ष आहे, त्यांनी दौलत बंद पाडण्यासाठी काय काय केलं हे बघा? आज शरद पवार यांच्या उमेदवाराला बघितलं तर कोणतरी एक काँट्रॅक्टर नाराज म्हणून उमेदवार उभा केला आहे. गेल्या वीस वर्षात तुम्ही ज्यांचा वारसा आणि तुतारी घेवून आलाय त्यांनी एकाला तरी रोजगार दिला का? असं असेल तर आता यांचं हे सह्मगळ चालवून घेणारे आणि चालवणारे यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. आता तिसरा जो उमेदवार आहे, तो एकदा दौलत चालवण्यासाठी आला होता. मात्र, त्याला शेतकरी, तोडणी वाहतूकदार यांच्या आयुष्याचं नुकसान करण्याचं पाप अप्पी पाटील यांनी केलं, ते पाप देखील धुवायचं काम अखेर खोराटे यांच्या वाट्याला आलं. त्यामुळे खरंच चंदगड मतदारसंघातील लोकांची सहनशीलता पहिली तर आश्चर्य वाटत. अशा माणसाला कसं काय समोर उभं राहू देतात. त्यामुळे सहनशिलतेचा पहिला पुरस्कार चंदगड तालुक्यात दिला पाहिजे. यातून अजून एक उमेदवाराला दहीहंडी करायची की डिस्को करायचं हे सुचत नाही. त्यामुळे या सगळ्या उमेदवारांचं विश्लेषण करा. नेसरीच्या भुमीतूनंच आपल्याला परिवर्तन आणायचं असून सुराज्य निर्माण करायचा निर्धार करूयात. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन कोरे यांनी केले. 

सुराज्य निर्माण करण्याचा हा विचार आहे. गेल्या वीस वर्षात या मतदारसंघाशी आमची एक नाळ जुळलेली आहे. या मतदारसंघाला एक एतिहासिक वारसा आहे. प्रतापराव गुर्जरपासून स्वामीकार, पू.ल. अशी एक समृध्द वारसा लाभला आहे. या सगळ्यात या मागच्या काळात आम्ही आज कुठे आहोत, कुठेतरी आपल्याला याचा शोध घेण्याची गरज आहे. आज गोवा, मुंबई, पुण्यातील हॉटेलात काम करण्यासाठी रोजगार शोधण्यासाठी चंदगडकडे पाहिलं जात. आज चंदगड तालुक्याच्या डोंगरी भागात धनगरवाड्यावर गेल्यावर आपल्याला कळतं की आजही या ठिकाणच्या मुलींना शिक्षणाची वाट सापडत नाही. त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. त्याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही असा सवाल करून हीच वेळ आहे नेतृत्व बदलण्याची त्यामुळे परिवर्तन करण्याचं आवाहन केलं.

- रेकॉर्ड ब्रेक गर्दीच विजयाची नांदी 
यावेळी मानसिंग खोराटे, आजची गर्दी ही प्रामाणिक लोकांची आहे, कुणाला आणलं गेलेलं नाही. आज मोठं मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या त्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे. त्यामुळे ही रेकॉर्ड ब्रेक गर्दीच विजयाची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आज मी एका गरीब शेतकरी, गिरणी कामगार घरातून येत असल्याने मला इथल्या शेतकरी, कामगार यांचे कष्ट, त्यांना मिळणारा घामाचा दाम सगळं माहीत आहे. त्यामुळे या सर्वसामान्य लोकांचं हित साधण्यासाठी या निवडणुकीत उतरलो आहे. 

- चंदगड मतदारसंघाला राज्यात टॉपमध्ये नेणार

आम्ही दौलत घेतल्यावर बाकीच्यांना दौलत घेण्याचं सुचलं. पण, यांना ती चालवायची नाही, ती काही करून बंद पडायची होती. पण, आज तीच दौलत सुरळीत सुरू आहे. जी कोणीही चालवू शकत नाही असं बोललं जात होतं. त्या दौलतला राज्यात तीन नंबरचा कारखाना करून दाखावला. याच धर्तीवर मला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन मला काम करायचं आहे. या मतदारसंघाला राज्यात टॉपमध्ये नेण्याचं काम करून दाखवतो. 

- गडहिंग्लज कारखाना सुरळीत चालून दाखवू
तसेच मी शब्द देतो जर गडहिंग्लज कारखाना यंदा सुरळीत सुरू होऊ शकला नाही तर तो देखील घेऊन चांगल्या पद्धतीने चालवून दाखवतो असा विश्वास खोराटे यांनी दिला.

डॉ. प्रकाश शहापुरकर, हातावर पोट भरणाऱ्या एका गिरणी कामगाराचा मुलगा शेताच्या पायावर उभा राहतो, कुणालाही टोपी घालून नाही, लुबाडत नाही, फसवत नाही, अशा एका चांगली माणसाला पाठबळ देणे, त्यांच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही पाठिंबा दिलं आहे. आजपर्यंत एकाही नेत्याला सध्या एक चांगला उद्योग आणता आला नाही. पण एखादा चांगली गोष्ट करत असेल तर मात्र, त्याला खाली ओढण्याची सगळ्यांना घाई लागली आहे. तुम्ही आजपर्यंत काही करू शकला नाही तर आता सत्ता घेऊन तुम्ही काय करणार? या सगळ्यात एकमेव इडियल उमेदवार खोराटे आहेत, ज्यांना एक औद्योगिक नजर आहे, एक व्हिजन आहे. त्यांच्यासारखा स्वकर्तृत्वावर निर्माण झालेल्या माणसावर विश्वास ठेऊन हा मतदारसंघ त्यांच्या हातात देण्याची आज खरी गरज आहे. दौलत आजपर्यंत एकही माणसाच्या हातात राहिला नाही, किंबहुना राहू दिला नाही. मानसिंग खोराटे यांना देखील तो हातात देवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, पण ते सगळ्यांना पुरून उरले. त्यांना आता दौलत पुढेही सुरळीत सुरू ठेवायचं असेल तर आमदार होण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून चांगल्या मताधिक्याने मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन डॉ. शहापूरकर यांनी केले.

आज आमदारांनी लोकांचा विश्वास फोल ठरवला. त्याच्याकडे आशेने लोक पाहत होते मात्र, ते फक्त फसवणूक करतायत. आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अशा लोकांचा पत्ता कट करण्याचं काम, या राजेश पाटील यांना खुर्चीवरून खाली खेचायचं काम आधी केलं पाहिजे असा घणाघात ॲड. संतोष मळविकर यांनी केला. केडीसी, शिक्षण संस्था, गोकुळ, सोसायटी, दूध डेअरी सगळीकडे एकच घरातले लोक, का दुसरं कुणी दिसत नाही का? या गोष्टीचा गांभीर्याने बघितलं पाहिजे. बोर्ड फडणे, खोट्या बातम्या पेरणे, सोशल मीडियावर अफवा पसरवणे असे धंदे का करताय? एक यशस्वी उद्योजक जो बंद पडलेला कारखाना सुरू करतो, शेतकरी, कामगार यांचे भलं करतो, तो मतदारसंघाचं नेतृत्व का करू शकत नाही? त्यामुळे मानसिंग खोराटे यांना आता निवडून आणल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे चूक करू नका, यावेळी शहाणे व्हा, चांगलं नेतृत्व निवडा, मानसिंग खोराटे यांना निवडून द्या असं आवाहन मळविकर यांनी केले. 

आजपर्यंत यांना बेरोजगारी दिसली नाही, पर्यावरण, पर्यटन दिसलं नाही. आज मात्र, खोराटे यांनी हे मुद्दे घेतल्यावर मात्र तुम्ही त्याची कॉपी करताय. तुम्ही मागेच हे केले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. मागच्यावेळी आम्हीच या माजी आमदाराच्या पाठीशी होतो, पण ती घोड चूक झाली, त्याबद्दल आम्ही जाहीर माफी मागतो. यावेळी मात्र ती चूक सुधारून एक शाश्वत नेतृत्व मानसिंग खोराटे यांच्या रूपाने निवडून देऊया असं आवाहन स्वाभिमानीचे नेते जगन्नाथ हुलजी यांनी केले.

बी. एम. पाटील म्हणाले, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारीने मानसिंग खोराटे यांना मोठं पाठबळ मिळालं आहे. त्यामुळे या नारळाच्या बागेतील नारळ विरोधकांच्या डोकीत नारळ पडणार, आणि खोराटे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment