चंदगड : प्रतिनिधी
पार्ले (ता. चंदगड) येथील गावाच्या हद्दीत मालुसरेवाडी वस्ती जवळ एका जंगली प्राण्याने चरणाऱ्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. धनश्री एकनाथ गावडे (रा पार्ले) यांच्या मालकीची ही गाय होती. शुक्रवारी (ता 15) दुपारी ही घटना घडली. हा पटेरी वाघ असल्याची शक्यता असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पार्ले गावातील काही गुराखी आपली गुरे घेऊन मासुरे वाडी येथे चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या वेळी अचानकपणे जंगली प्राण्याकडून गायीवर हल्ल्या झाल्यानंतर इतर प्राणी देखील ओरडत पळस सुटले. हा आवाज व जनावरांचे ओरडणे ऐकून गुराखी व आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. या आरडाओरड्याने व माणसांची चाहूल लागल्याने हल्लेखोर प्राणी लगतच्या जंगलात पळून गेला. पाहतात तर काय गायीवर कोणत्यातरी जंगली प्राण्यांने हल्ला करून तिला जखमी केली होते. यावेळी गाय जिवंत होती. मात्र गाईच्या शरीरावर नखाने ओरबडल्याने व ठीक ठिकाणी दाताने चावा घेतला असल्याने गाईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन ती जागीच गतप्राण झाली.
वन विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करून आज दिनांक १६ रोजी वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल आवळे यांनी दिली. तत्पूर्वी काल सायंकाळी व आज दुपारपर्यंत वनक्षेत्रपाल यांच्या आदेशानुसार वनपाल जे आर डिसोजा, पी एस कुलाळ (वनरक्षक पार्ले), के एस कोरे (वनरक्षक पाटणे), तसेच वनसेवक एस के शिंदे, टी डी गुरव, सी आर बांदेकर, यांचेसह वन हत्ती हकारा गट पार्ले यांच्या पथकाने वाघ सदृश्य प्राण्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले.
हल्ला करणारा प्राणी हा गाईच्या अंगावरील ओरखडलेली नखे व चावलेल्या ठिकाणच्या दातांचा आकार पाहता पट्टेरी वाघ असण्याची शक्यता आहे. या जंगल परिसरात हत्तींचा सतत वावर असल्यामुळे हल्लेखोर प्राणी किंवा वाघ येथे स्थिर राहू शकणार नाही असे पाटणे विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment