चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठा जातीचा सरसकट ओबीसीत समावेश करून मराठा जातीला आरक्षण देणे, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, जातीनिहाय जनगणना करून वंचित घटकांना जातीच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते गंगाधर बनबरे व संभाजी ब्रिगेड पक्षाचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले. ते 'चंदगड' विधानसभा मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार परशराम उर्फ प्रशांत पांडुरंग कुट्रे (मुळगाव केंचेवाडी, ता. चंदगड) यांच्या प्रचार दौऱ्या प्रसंगी नेसरी येथे बोलत होते.
संभाजी ब्रिगेडच्या या राज्यस्तरीय नेत्यांनी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर व त्यांच्यासह नेसरी नजिक बहलोल खानाच्या सैन्या बरोबर झालेल्या लढाईत शहीद झालेले सहा मावळे यांच्या कानडेवाडी नजीकच्या समाधीस्मारकास भेट देऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर नेसरी येथील चौकातील सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून प्रचाराची सुरुवात केली.
२७१ चंदगड विधानसभा मतदासंघाचे संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार परशराम कुट्रे यांच्या 'शिलाई मशीन' या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नेत्यांनी केले. यावेळी गंगाधर बनबरे, सौरभ खेडेकर यांच्यासह उमेदवार परशराम कुट्रे राज्य निवडणुक प्रमुख इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड, निवडणुक प्रसिद्धी प्रमुख सुयोग औंधकर, कोल्हापूर जिल्हा प्रवक्ते शहाजी देसाई, प्रतीक इंगवले, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रकाश इंगवले, पांडुरंग कुट्रे, मार्गदर्शक संजय वाघ,संदीप भोगन, बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते अमित कांबळे, राहुल मोरे, जोतिबा सुतार, किरण के. के., इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment