चंदगड : प्रतिनिधी
ग्रामीण भागात निसर्गावर अवलंबून असलेली सामाजिक, आर्थिक व्यवस्था बदलण्यासाठी लोकराज्य सुराज्य करण्यासाठी म्हणून संस्कार, संकल्प आणि सिद्धी या संकल्पनेतून आज मानसिंग खोराटे उभे आहेत. पहिल्याच प्रयत्नात या विचाराच्या चंदगड मतदारसंघ पाठीशी राहिला होता. आज पुन्हा एकदा ती संधी आलेली आहे. त्यामुळे मानसिंग खोराटे यांच्या रूपाने सुराज्य तुमचं दार ठोठावत आहे. तरी या पूर्व भागाने त्याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जनसुराज्यचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी व्यक्त केला.
पुर्व भागाने मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी रहावे.
चंदगडमध्ये कारखाना चालवणं अवघड होतं. तरी खोराटे यांनी यशस्वी साखर व्यवसाय ते कारखानदार असा प्रवास केला. अशात गडहिंग्लज कारखान्याला कसला शाप आहे माहीत नाही, सगळे प्रयोग करून झालेत पण, यश आलेलं नाही. आता मात्र, एक संधी आलेली आहे. त्यामुळे मानसिंग खोराटे यांच्या रूपाने सुराज्य तुमचं दार ठोठावत आहे. तरी या पूर्व भागाने त्याला प्रतिसाद द्यावा असं आवाहन कोरे यांनी केलं.
स्वागत रमेश आरबोळे यांनी केले. यावेळी मानसिंग खोराटे हे कर्तबगार व्यक्तिमत्त्व असून त्यांनी चंदगडमध्ये दौलतच्या माध्यमातून चांगलं काम केलं आहे. त्यामुळे गडहिंग्लज पूर्व भागातून चांगलं मताधिक्य देण्याचं आपलं कर्तव्य असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊया असे आवाहन आरोबोळे यांनी केले.
अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश सहापुरकर होते. यावेळी शिवाजी पाटील (जरळी), संदिप पाटील (औरनाळ), बाबुराबअण्णा मदकरी (दुंडगे), तम्माणा पाटील, दिनेश मदकरी, एस.एस. चौगुले, दयानंद कोणकेरी, अरुण गवळी, कुमार देसाई, शामकांत शिंदे, बसवराज धनवडे, संतोष भोसले, बसवराज आरबोळे, रमेश रिंगणे, संजय मिरजे, युवराय नाईक, अक्षय पाटील, प्रशांत काळापगोळ, आनंदा जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तळागाळातील आलेला एक कार्यकर्ता असून आज साखर कारखान्याचा चेअरमन आहे. त्यामुळे मला प्रत्येक टप्प्यावर काय परिस्थिती आहे याची जाणीव आहे. आज समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे समाजकरणाच्या माध्यमातून राजकारणात उतरलो आहे. आज चंदगड मतदारसंघात सर्वात भेडसावणारा प्रश्न म्हणजे बेरोजगारी असून ती संपवणं हेच माझं ध्येय आहे. विनय कोरे सावकर यांच्या वारणानगरकडे पाहून मी मोठा झालो असल्याने त्या पद्धतीचा विकास करण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी मला राजकीय पाठबळ गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी रहा, मला तुमचे आशीर्वाद देऊन मला विधानसभेत पाठवा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केले.
अगदी बंद पडलेला दौलत कारखाना जो सुरूच होऊ शकत नाही म्हणत होते, तो जर मी सुरू करू शकतो तर मग मतदारसंघ का पुढे नेऊ शकत नाही? तखरं तर आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, पण गडहिंग्लज पूर्व भागाचा केवळ मतासाठी एका दिवसासाठी वापर करून घेतला जातो, बाकी दिवशी तुम्हाला विचारलं जात नाही. त्यामुळे आता तरी जागृत व्हा, तुमचं एक मत खूप मोठं परिवर्तन करू शकतं. त्यामुळे मला साथ द्या या भागाचा कायापालट केल्याशिवाय केल्याशिवाय राहत नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
खरं तर खोराटेंना बिनविरोध निवडून द्यायला हवं...
- चंदगडच्या पाटलांना पुरून उरणारा एकमेव गंड पुरुष म्हणजे मानसिंग खोराटे आहे. खरं तर सगळ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून आणायला पाहिजे होतं. तरी पण तुम्ही ही संधी घ्या आणि मानसिंग खोराटे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केले.
नंदा इतक्या वर्षात सत्ता असून काय केलं? फक्त कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले, त्यातला सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर या नुलमध्येच आहे. त्यामुळे खोराटे सोडले तर कुणीही विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाही. तरी त्यांच्या पाठीशी रहा.
- कुठलेही भाऊ असुद्या दमदाटी नाही
दमदाटीने काहीच होऊ शकत नाही. लोकांच्या मनात जागा निर्माण करावी लागते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गावाचे भाऊ असाल, ती खपवून घेतली जाणार नाही. आम्ही पण गप्प बसणार नाही, तर आमच्याही मनगटात ताकद असल्याचा इशाराही खोराटे यांनी यावेळी दिला.
शहापूरकर म्हणाले, पाण्याची पुण्याई होई उतराई असं म्हणत लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. खरं तर कृष्णा खोरे लवादाच्या माध्यमातून ते पाणी अडवलं नसतं तर ते पाणी कर्नाटकला गेलं असतं. त्याचं श्रेय हे कसं घेऊ शकतात. कृष्णा खोरे पण कधी तर ९५ ला युती सरकारमध्ये झालं. अशात तुम्ही कशाचं क्रेडिट घेता? असा सवाल करून कुपेकर यांच्यावर घणाघात केला. तर या भागात केवळ आणि केवळ खोराटे हेच उद्योग आणून तरुणांना रोजगार देण्यास सक्षम आहेत. त्यांनी ते दौलतमधून करून दाखवलं आहे. त्यामुळे या भागातील बेरोजगारी घालवण्यासाठी, महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी, या भागाचं नंदणवन करण्यासाठी खोराटे यांना निवडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचं डॉ. शहापूरकर म्हणाले.
मानसिंग खोराटे म्हणाले, जो कारखाना सुरूच होऊ शकत नाही म्हटलं जात होतं तो जर मी राज्यात टॉपला नेवू शकतो तर मी मतदारसंघाचा विकास का नाही करणार, तुम्ही मला राजकीय पाठबळ द्या, बघा मी असे पन्नास कारखाने या भागात उभं करून दाखवतो. त्यातून हजारो नोकऱ्या उपलब्ध होतील. आज तीनही तालुक्यात लाखो बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नाही. त्यासाठी आपल्या भागात दोन एम आय. डी.सी. आहेत, तेथे उद्योग येऊ शकतात, केवळ राजकीय इच्छाशक्ती हवी आहे, ती माझ्यात ओतप्रोत भरून आहे, केवळ तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, मग बघा मतदारसंघाचा चेहरा मोहराचं बदलून जाईल असं आवाहन खोराटे यांनी केलं. तसेच गडहिंग्लज पूर्व भाग पाण्याच्या प्रश्नाने हैराण आहे, इथले लोक सहकार्य करायला तयार आहेत, ते तर उद्योगाला देखील जमिनी द्यायला तयार आहेत मग कशाची अडचण आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांना एकच उत्तर असून ते म्हणजे तुमचं राजकीय पाठबळ, या निवडणुकीत तुम्ही मतरुपी आशीर्वाद द्या मी तुम्हाला बेरोजगारी, पाणी प्रश्नातून बाहेर नक्की काढतो असं आश्वासन खोराटे यांनी दिले.
No comments:
Post a Comment