शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार तुलसीदास जोशी यांच्या घर टू घर प्रचाराने विरोधकांना धडकी - चंदगड लाईव्ह न्युज

18 November 2024

शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार तुलसीदास जोशी यांच्या घर टू घर प्रचाराने विरोधकांना धडकी



चंदगड : सी एल वृत्तसेवा
    २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार तुलसीदास लक्ष्मण जोशी यांच्या मतदारसंघातील घर टू घर प्रचाराने विरोधकांच्या गोटात धडकी भरवली आहे. तुळशीदास जोशी यांनी घेतलेली मते कुणाचा गेम करणार याची चर्चा होत असताना स्वतः तुलसीदास जोशी यांनी मी कुणाची मते खाण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर जिंकून येण्यासाठी लढवत आहे असे सांगितले. चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावचे रहिवासी असलेले तुळशीदास जोशी स्वतः प्रसिद्ध कबड्डीपटू असल्याने चंदगड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील तरुणांशी त्यांचा चांगला व मोठा संपर्क आहे. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ तरुणांची मोठी फौज मतदारसंघात वावरताना दिसत आहे.
  त्यांची सर्वसामान्य लोकांशी मिळून मिसळून राहण्याची, त्यांच्याशी आदरपूर्वक वागण्याची पद्धत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, क्रीडा प्रेमी, महिला बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याची तळमळ पाहून शेतकरी संघटनेचे बलाढ्य नेते संघटनेचे राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी तुळशीदास जोशी यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. जोशी यांच्या प्रचारासाठी त्यांची नुकतीच कालकुंद्री येथे जाहीर सभा पार पडली. त्यामुळे सुरुवातीला नगण्य उमेदवार समजल्या जाणाऱ्या तुळशीदास जोशी व त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात बऱ्यापैकी हवा निर्माण केल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
  गेल्या १०-१२ दिवसांत त्यांनी चंदगड तालुक्यातील कालकुंद्री, कुदनूर, किटवाड, होसूर, कागणी, कोवाड, निट्टूर, किणी, नागरदळे, कडलगे, ढोलगरवाडी, मांडेदुर्ग, गौळवाडी, कार्वे, बसर्गे, नरेवाडी, लकीकट्टे, माणगाव, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, मलतवाडी, चिंचणे कामेवाडी, राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक, दुंडगे, तेऊरवाडी, शिवणगे, माणगाव, रामपूर, तांबूळवाडी आदी सर्व गावांसह गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे, तेरणी, हलकर्णी, बुगडीकट्टी, बसर्गे, नरेवाडी, नुल, कळविकट्टे, खणदाळ, हिटणी असा सांबरे- नेसरी पासून हिटणी- संकेश्वर पर्यंतचा भाग पिंजून काढला आहे. घर टू घर प्रचार व सामान्यातील सामान्य मतदाराला आदरपूर्वक केलेल्या विनंतीला मतदार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. तुलसीदास लक्ष्मण जोशी उर्फ तुलसी महाराज यांच्या अकरा नंबर वरील बासरी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना आम्ही मतदान करणार असे मतदार सांगताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment