कै. र. भा. माडखोलकर |
चंदगड / प्रतिनिधी
खेडूत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन कै. र. भा. माडखोलकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरीय खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खेडूत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी कै. र. भा. माडखोलकर यांची जयंती एक डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात खुल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी लोकशाहीचे वस्त्रहरण, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि तरुणाईचे भवितव्य, सामाजिक जडणघडणीत संतांचे योगदान, शिक्षणमहर्षी र. भा. माडखोलकर यांचे योगदान, पश्चिम घाटाचे ढासळते पर्यावरण चिंतेची बाब असे विषय आहेत.
या स्पर्धेसाठी, प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रुपये ४००० हजार, ३००० हजार, २००० हजार, १००० अशी बक्षिसे ठेवण्यात आला असून प्रवेश फी ५० रुपये आहे.
इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा संयोजन समिती समन्वयक प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. एल. एन. गायकवाड, व प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment