कै. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त १ डिसेंबरला रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2024

कै. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त १ डिसेंबरला रक्तदान शिबीराचे आयोजन

 

कै. र. भा. माडखोलकर

चंदगड / प्रतिनिधी
     येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने खेडूत शिक्षण संस्थेचे संकल्पक माजी चेअरमन कै. र. भा. माडखोलकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने १ डिसेंबर २०२४ रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
      सालाबादप्रमाणे यावर्षीही र. भा. माडखोलकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. याचाच एक भाग म्हणून यावर्षीही रविवार १ डिसेंबर २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव येथील प्रसिद्ध ब्लड बँक व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने होणाऱ्या या  रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन  रक्तदान हेच श्रेष्ठदान याचे व्रत घेऊन  सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील व प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment