कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे सुपुत्र माजी सैनिक व नुकतीच मुंबई पोलीसपदी निवड झालेले कामाण्णा बाबू पाटील यांनी आपल्या गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास पाच हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. मुंबई पोलीस पदी निवड झालेबद्दल तसेच वाचनालयास पुस्तके भेट दिल्याबद्दल त्यांचा प्रा व्ही आर पाटील व ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कामाण्णा यांनी आपल्या आई शेवंता व वडील बाबू पाटील यांच्या हस्ते ही दर्जेदार निवडक पुस्तके प्रदान केली. यावेळी पाटील यांनी बोलताना 'माझ्या आईला व कुटुंबातील सदस्यांना वाचनाचा छंद आहे. तो ज्ञानदीप वाचनालयाच्या माध्यमातून पूर्ण होतो. त्यामुळे वाचनालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाचनालयाला पुस्तके भेट देताना अत्यानंद होत आहे." असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी गजानन पाटील, नारायण पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील, वाचनालयाचे सदस्य शिवाजी पाटील, विनायक पाटील, परशराम कडोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष के जे पाटील यांनी केले. युवराज पाटील पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment