कृष्णराव धोंडीबा सावंत |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील रहिवासी कृष्णराव धोंडीबा सावंत (वय वर्ष ९१) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. चंदगड तालुक्यातील पहिले ग्रामसेवक ते शेती विस्तार अधिकारी अशा विविध पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. सदानंद सावंत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष सावंत व फोटो ग्राफर अशोक सावंत यांचे वडील होत.
No comments:
Post a Comment