कालकुंद्री येथे किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण, शिवशंभो ग्रुप व भीम क्रांती मंडळे प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2024

कालकुंद्री येथे किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण, शिवशंभो ग्रुप व भीम क्रांती मंडळे प्रथम

 

मोठा गट प्रथम क्रमांक- पद्मदुर्ग

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

  कालकुंद्री, तालुका चंदगड येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिवाळी सुट्टीत किल्ला स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाही या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.  गावमर्यादित स्वरूपात झालेल्या या स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात पार पडल्या. लहान गटात एकूण १८ तर मोठ्या गटात १० मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील मोठ्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ३०००,  २५००, २०००, १५००  व चषक तर लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये १२००, १०००,७००, ५०० व चषक देण्यात आले तर सहभागी सर्व स्पर्धक मंडळांना मावळा प्रतिकृती भेट देण्यात आली. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

लहान गट

प्रथम क्रमांक- शिवशंभू ग्रुप सरस्वती नगर, द्वितीय क्रमांक - राजू ग्रुप सावरकर नगर, तृतीय क्रमांक- भवानी ग्रुप सुभाष गल्ली, चतुर्थ क्रमांक- सुभाष गल्ली मंडळ

मोठा गट

प्रथम क्रमांक- भिमक्रांती ग्रुप आंबेडकर नगर, द्वितीय क्रमांक- हिंदवी स्वराज्य यादव गल्ली, तृतीय क्रमांक- राजेवाडी ग्रुप सुभाष गल्ली, चतुर्थ क्रमांक- मोरया ग्रुप शिवाजी गल्ली

पर्यावरण पुरक किल्ला - देवगल्ली युवा मंच

उक्तृष्ट सादरीकरण- रौद्रशंभो ग्रुप संभाजी गल्ली

  किल्ला परीक्षण करताना किल्ला बांधणी, सादरीकरण, पर्यावरण पूरक प्रतिकृती, विद्युत रोषणाई, सजावट, किल्ल्यावरील वस्तू व वास्तु, किल्ल्याबद्दलची माहिती वरील आधारित प्रश्नांची उत्तरे या बाबींचा विचार करण्यात आला.

    गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी  युवराज पाटील व तुलसीदास जोशी आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कांबळे यांनी केले. भूषण पाटील यांनी आभार मानले. स्पर्धा पार पाडण्यासाठी शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment