तिलारी दोडामार्ग घाटात रस्त्याकडेला पलटी झालेली कार.
दोडामार्ग : सी एल वृत्तसेवा
तिलारी - दोडामार्ग घाटात ते विजघर मार्गावरील मेढे गावाजवळ गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या कारला अपघात झाला. यात का कार मधील पर्यटक किरकोळ जखमी झाले.
दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जवळचा मार्ग असलेल्या तिलारी- दोडामार्ग घाट मार्गे गोवा राज्यात जात आहेत. सांगली येथील काही पर्यटक गोव्यात जाण्यासाठी निघाले असताना दोडामार्ग ते विजघर बेळगाव कोल्हापूर मार्गावर मेढे येथे एका वळणावर कार चालकाला पहाटेच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने ताबा सुटून कार रस्ता कडेला जाऊन पलटी झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात आतील प्रवासी पर्यटक किरकोळ जखमी झाले. अपघात ठिकाणी भेट दिली असता कुणी नव्हते. ते दुसऱ्या गाडीने गेले. सदर कार ही सांगली येथील असल्याचे नंबर प्लेट वरून लक्षात येते.
No comments:
Post a Comment