कोवाड : सी एल वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड) येथील गंगू वैजनाथ पाटील (वय 80) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 20) पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, दोन सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 21) सकाळी करण्यात झाले. मुंबई येथील रामदास पाटील व प्रगतशील शेतकरी सुधाकर पाटील यांच्या त्या आई होत. तसेच आजरा येथील रहिवासी, शिक्षण विभागाचे निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी बिर्जे (किणी) यांच्या त्या बहीण तर किणी (ता. चंदगड) येथील दिवंगत ह. भ. प. दत्तू नारायण बिर्जे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होय.
No comments:
Post a Comment