माडखोलकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. गोरल यांना डी .लीट पदवी प्राप्त - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2024

माडखोलकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. गोरल यांना डी .लीट पदवी प्राप्त

प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल

चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांना अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका, बोलिव्हिया (U.S) विद्यापीठाकडून अत्यंत प्रतिष्ठेची असणारी डी .लीट. ही पदवी प्राप्त झाली आहे.
 येथील र. भा.माडखोलकर महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे प्र. प्राचार्य डॉ एस डी गोरल यांच्या शैक्षणिक व संशोधकीय कार्याची दखल घेऊन अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका, बोलिव्हिया (U.S) विद्यापीठाने  अत्यंत प्रतिष्ठेची  डी. लिट.ही पदवी देऊन सन्मान केला.
 वाणिज्य विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. गोरल यांना 25 वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचा अनुभव असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून त्यांचे पन्नासहुन अधिक संशोधनपर पेपर प्रसिद्ध आहेत. जवळपास 200 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार, चर्चासत्र व परिषदांमधून त्यांनी कृतिशील सहभाग नोंदवला आहे. ते पीएच.डी.चे मार्गदर्शक असून एका विद्यार्थ्यांनी पीएच.डी  पूर्ण केली आहे. दोन विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाशी संबंधित 12 पुस्तकांच्या सहलेखनाचा त्यांना अनुभव आहे. 2017 पासून ते शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहतात. तर 2022 पासून ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यास मंडळावर कार्यरत असून विद्यापीठाच्या विविध कमिट्यावर त्यांनी काम केलेले आहे. ते सावंतवाडी येथील पंचम खेमराज स्वायत्त महाविद्यालयातील बँकिंग आणि विमाशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यशाळेत परिसंवादामध्ये साधन व्यक्ती म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सन 2013 साली महाविद्यालयात झालेल्या न्याक मूल्यांकन ( दुसरा टप्पा) कमिटीच्या समन्वय पदाची धुरा ही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. या त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध पाच ते सहा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मूळचे माणिकवाडी (ता. खानापूर- बेळगाव) येथील  डॉ.गोरल यांनी संकटाला संधी मानून अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे.
 या त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अमेरिकेसारख्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका, बोलिव्हिया (U.S) विद्यापीठामार्फत  डी.लीट पदवीने त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment