चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारताचे संविधान हे जगातील सर्वोच्च संविधान असून संपूर्ण जगाला हे शांतता, सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, न्याय, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता व बंधूतेची शिकवण देणारे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. प्रा. ए. डी. कांबळे यानी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थिताना शपथ दिली. आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, स्टाफ व एन.एस.एस. समिती सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment