दि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थ्यी संभाजी चौकात मतदान जनजागृती पथनाट्य सादर करताना.
चंदगड: प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मजबूत करण्यासाठी दि न्यू इंग्लिश स्कूलने मतदान जनजागृती पथनाटय संभाजी चौक, कैलास कॉर्नर या ठीकाणी सादर केले. मुख्याध्यापक एन.डी. देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साबळे, बी. आर. चिगरे यांनी या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी मतदान करणे का आवश्यक आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान महत्वाची भूमिका बजावत असल्याचे लोकांना पटवून दिले.
या पथनाट्यात कु. सुकन्या आनंदाचे, वैष्णवी तोरस्कर. श्रावणी कोपर्डे, संस्कृती वाके, आर्या मोहिते, संगीता यमकर, हर्षदा भवारी, उत्कर्षा भवारीचिराग दुगानी, विशाल मांगले, युवराज हळवणकर, उत्कर्ष कुंभार, कार्तिक निट्टूरकर यांनी सहभाग घेतला. गुरुवार बाजारचा दिवस असल्यामुळे अनेक नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहचवण्यात विद्यार्थी यशस्वी झाले.
No comments:
Post a Comment