भारत देशाला महासत्ता बनविणे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते: डॉ मधुकर जाधव, हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत 'पंडित जवाहरलाल नेहरू जंयती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2024

भारत देशाला महासत्ता बनविणे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न होते: डॉ मधुकर जाधव, हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागामार्फत 'पंडित जवाहरलाल नेहरू जंयती साजरी

चंदगड/प्रतिनिधी :

'आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणुन पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान श्रेष्ठ आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले कार्य सर्व भारतवासीयांना प्रेरणा देत आहे. त्यांनी भारताला वैज्ञानिक व तांत्रिकदृष्टीने सक्षम बनविले. स्वतंत्र भारताला शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या ताकतवान बनविले. परराष्ट्रीय धोरण मजबूत करण्यासाठी त्यांनी योग्य पावले उचलली त्यांचे विचार भारताच्या महासत्तेसाठी महत्वपूर्ण आहेत' असे प्रतिपादन डॉ. मधुकर जाधव यांनी केले. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत आयोजित पंडित जवाहरलाल नेहरू जंयती व बालदिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. पी.ए. पाटील उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. आय आर जरळी, प्रा. एस. डी. तावदारे, डॉ. सी. बी. पोतदार, डॉ एस आर वायकर, प्रा. ए. एस. बागवान उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी केले तर स्वागत डॉ. व्ही. व्ही. कोलकार यांनी केले. प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यकमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी अजळकर यांचे प्रोत्साहन लाभले.

              डॉ. जाधव पुढे म्हणाले, 'मुलांच्या आणि तरूणाईच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी त्यांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची ओळख म्हणुन त्यांचा जन्मदिवस आज बालदिन म्हणुन साजरा केला जात आहे. आजच्या तरूणाईने त्यांचा आदर्श घेवून प्रत्येक कार्य यशस्वी करावे' प्रा. एस. डी. तावदारे व प्रा. ए. एस. बागवान यांनीही आपले विचार मांडले अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य पी. ए. पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. या कार्यकम प्रसंगी डॉ. आर. ए. घोरपडे, डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ.ए.व्ही. पाटील, प्रा. एन. के. जावीर, प्रा. नाईक जे वाय , प्रा. जे. एम. उत्तुरे, प्रा. दामीनी पाटील, प्रा. गीतांजली पाटील, बी. बी. नाईक, नंदकुमार बोकडे,  विनायक मुगेरी,  युवराज रोड, प्रकाश बागडी, सौ. माधुरी पाटील, श्री गोविंद नाईक, अल्ताफ मकानदार, प्रशांत नाईक, प्रदिप सावंत आदि. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. व्ही. कोलकार यांनी केले तर आभार डॉ. सरीता मोटराचे यांनी मानले.

No comments:

Post a Comment