चंदगड/प्रतिनिधी
भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ व आदर्श आहे .भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे सर्व जाती धर्माचे , विविध भाषेचे लोक गुण्यागोविंदाने राहतात . या सर्वांना एकसंघ करण्याचे कार्य संविधानाने केले आहे . स्वातंत्र्य , समता , बंधुता , सर्वांना समान संधी समान अधिकार देण्याचे कार्य भारतीय राज्यघटनेने दिले आहेत. यामुळेच भारतीय राज्यघटना जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे . या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व धर्मांचा, जातींचा भाषेंचा , तळागाळातील सामान्य व्यक्तींचा विचार करून राज्यघटनेचे लेखन केले आहे. 26 नोव्हेंबर 2026 हे आपल्या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे आपले संविधान होय .'असे मत प्रा. एन के जावीर यांनी व्यक्त केले . हलकर्णी ता चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर व उपप्राचार्य प्रा आर बी गावडे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले . राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा यु एस पाटील यांनी प्रास्ताविक केले . तसेच प्रकल्प अधिकारी प्रा शाहू गावडे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ राजेश घोरपडे , प्रा एस बागवान , डॉ ज्योती व्हटकर , प्रा एस एन पाटील , प्रा. सचिन शेळके, प्रशांत शेंडे , श्रीपत कांबळे, संजय कांबळे ,प्रशांत नाईक आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार प्रा.आर व्ही पाडवी यांनी मानले.
No comments:
Post a Comment