आंबेवाडी येथे पकडलेल्या सहा फूट लांबीच्या नाग सापासोबत प्राध्यापक सदाशिव पाटील. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी येथील सर्प शाळा प्रमुख प्रा सदाशिव पाटील यांनी आजतागायत साडेपाच हजार पेक्षा अधिक सर्प पकडून त्यांना जीवदान दिले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी परिसरातील वेगवेगळ्या गावात नाग, घोणस व मण्यार असे वेगवेगळे अति जहाल विषारी साप पकडले होते. त्यात आता आणखी एका सापाची भर पडली आहे. काल दि. ३०/१०/२०२४ रोजी संध्याकाळी आंबेवाडी, ता. चंदगड येथील विलास गावडे यांच्या घरामध्ये मिळाला प्रचंड मोठा विषारी नाग पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आला. प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी गेल्या ३५ ते ४० वर्षात सापांच्या माध्यमातून केलेल्या पर्यावरण पूरक जनसेवेमुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment