चंदगड / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांच्या काजू बी साठी प्रती किलो १० रु. प्रमाणे अनुदान योजना घोषीत केलेले आहे. यासाठी अर्ज करण्याला तीन वेळा मुदतवाढ दिली होती. यासाठीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होती. राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांचे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या विचारात घेता, सदर योजने अंतर्गत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने अनुदान मागनीचे अर्ज सादर करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र राज्य काजू मंडळ पुणेचे मुख्य कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिध्दीला दिले आहे.
महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना उचित किंमत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू बी साठी प्रति किलो १० रु. अनुदान लागू करण्यात आलेले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुदतवाढ झालेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशराम पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment