माडखोलकर महाविद्यालयाला भेट दिल्याबद्दल आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य एस. डी. गोरल व इतर प्राध्यापक
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभेचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी नुकतीच चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयास सदिच्छा भेट देऊन भरघोस मदत करण्याचे अभिवचन दिले.
येथील दि. न्यू. इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी र. भा. माडखोलकर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यकर्तुत्वाचा कार्याचा आढावा घेऊन, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विविध व्यावसायिक कोर्स उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली. या कामी येणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणी संदर्भात आमदार पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार श्री. पाटील म्हणाले की, ``खेडूत शिक्षण संस्थेने चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत दिशादर्शक काम केले आहे. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जय जवान जय किसान हा यशस्वी महामेळावा घेतल्यानेच यशाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, या शिक्षण संस्थेसाठी व महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.``
यावेळी गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, माजी सभापती शांताराम बापू पाटील, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, शाहू गावडे, श्रीनिवास पाटील, नंदकुमार चांदेकर, अरुण कांबळे यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment