माडखोलकर महाविद्यालयात प्रल्हाद कांबळे यांची शोकसभा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2024

माडखोलकर महाविद्यालयात प्रल्हाद कांबळे यांची शोकसभा संपन्न

चंदगड / प्रतिनिधी

         येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील प्रामाणिक व मनमिळावू शिक्षकेतर कर्मचारी प्रल्हाद गोपाळ कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने महाविद्यालयात शोक सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.

        यावेळी प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. अरुण जाधव, प्रा. सौ. एस. बी. दिवेकर, डॉ. संजय पाटील, डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. श्रीनिवास पाटील इत्यादी प्रल्हाद कांबळे यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली.

       यावेळी प्राचार्य डॉ. गोरल यांनी महाविद्यालयाच्या प्रत्येक कामात झोकून देऊन  काम करणारा एक प्रामाणिक  शिलेदार म्हणून प्रल्हादची ओळख कायम राहील. प्रत्येक कामात  तत्पर असणारा व सर्व विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारा प्रल्हाद सर्वांच्या कायम लक्षात राहील असे सांगून त्यांनी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहिली. या शोकसभेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment