चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तांबुळवाडी (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त प्राचार्य आर. आय. पाटील यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मार्फत आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार नवी मुंबई -नेरूळ येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट् राज्य फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. आणासाहेब टेकाळे, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाणे, ज्ये. ना. सामजिक संस्थेचे अध्यक्ष डी. एन. चापके, फेस्कॉमचे माजी अध्यक्ष अरूण रोडे, फेस्कॉमचे मुख्य सचिव चंदकांत महामुनी, कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेस्कॉमचे अध्यक्ष रामचंद्र ईश्वरा पाटील, माजी अध्यक्ष दिलीप पेटकर, महाराष्ट्र राज्य ज्ये. ना. ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष बी. डी. फराकटेसह महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थितीत होते.
आर. आय. पाटील चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव असून २०१० पासून ज्येष्ठ नागरिक चळवळीमध्ये सक्रीय आहेत. २०११ मध्ये तांबुळवाडी येथे चैतन्य ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ स्थापन केले त्याचे ते संस्थापक आहेत. २०१३ मध्ये कोल्हापूर प्रादेशिक विभाग (फेस्कॉम) सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वर्तमानपत्रं, व्हाट्सअप व इतर लाईव्ह माध्यमाद्वारे प्रसार करण्यात त्यांचा विशेष सहभाग होता. आर. आय. पाटील यांची सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम तसेच फेस्कॉमचे उद्दीष्ट, ध्येयधोरणानुसार विविध स्तरांवरील श्री. पाटील यांचे योगदान व सहभागी नेतृत्व यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचा (फेस्कॉम) आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment