कोवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात, समूहगीत, समूहनृत्य, नाट्यीकरण विभागात कोवाड शाळेचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2024

कोवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात, समूहगीत, समूहनृत्य, नाट्यीकरण विभागात कोवाड शाळेचे यश

दुंडगे येथे कोवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत वरिष्ठ गटात समूह नृत्य सादर करताना छत्रपती शिवाजी विद्यालय मलतवाडी शाळेचे विद्यार्थी.

कोवाड : सी एल वृत्तसेवा
   कोवाड केंद्रांतर्गत नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत कनिष्ठ गटातील समूहगीत, समूह नृत्य व नाट्यीकरण विभागात केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड शाळेने यश प्राप्त केले. विद्या मंदिर दुंडगे, ता चंदगड येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या.
   स्पर्धेतील विविध गटातील विजेत्या शाळा पुढील प्रमाणे कनिष्ठ गट समूहगीत प्रथम- केंद्र शाळा कोवाड, द्वितीय- विद्या मंदिर कामेवाडी. समूह नृत्य स्पर्धा प्रथम- केंद्र शाळा कोवाड, द्वितीय- विद्या मंदिर किणी. नाट्यीकरण स्पर्धा प्रथम- केंद्र शाळा कोवाड, द्वितीय- विद्या मंदिर दुंडगे. कथाकथन स्पर्धा प्रथम- छ. शिवाजी विद्यालय मलतवाडी, द्वितीय- विद्यामंदिर कामेवाडी, प्रश्नमंजुषा प्रथम- विद्यामंदिर दुंडगे, द्वितीय- विद्यामंदिर किणी.
   वरिष्ठ गट समूहगीत स्पर्धा प्रथम- छ. शिवाजी विद्यालय मलतवाडी, द्वितीय- वि मं कामेवाडी. समूहनृत्य प्रथम- विमं. दुंडगे, द्वितीय- विमं. किणी. नाट्यीकरण प्रथम- विमं. कामेवाडी, द्वितीय- विमं. किणी. कथाकथन प्रथम- विमं. तेऊरवाडी, द्वितीय-  मलतवाडी, प्रश्नमंजुषा प्रथम- विमं. किणी, द्वितीय- मलतवाडी. या शाळांनी यश मिळवले. स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड, तेऊरवाडी, चिंचणे, दुंडगे, कामेवाडी, मलतवाडी, घुल्लेवाडी, निट्टूर, किणी, जक्कनहट्टी या शाळांनी सहभाग घेतला. स्वागत केंद्रप्रमुख एस के पाटील यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
   स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना कानूर येथे होणाऱ्या चंदगड तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment