चंदगड तालुका पुणे रहिवासी संघाचा २८ रोजी पुणे येथे स्नेह मेळावा, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2024

चंदगड तालुका पुणे रहिवासी संघाचा २८ रोजी पुणे येथे स्नेह मेळावा, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
    नागरिक रहिवासी संघ चंदगड तालुका, पुणे (रजि.) यांच्या वतीने सन २०२४-२५ चा वार्षिक स्नेह मेळावा पुणे येथे दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुणे- सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहा नजीक टेंभेकर हॉल पद्मावती (स्वामी विवेकानंद पुलाजवळ) पुणे येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती ओमाना शिट्याळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्नेह मेळावा कार्यक्रमास केंद्रीय विमान वाहतूक मंत्री खा. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, चंदगडचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील, खडकवासला-पुणे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार भीमराव तापकीर, प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र लेखक डॉ. सदानंद गावडे (नांदवडे), जागतिक कृषी अर्थतज्ञ व अपेडा वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकारचे संचालक डॉ. परशराम पाटील (गुडेवाडी) यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मण पुंडलिक सावंत (माजी अध्यक्ष पुणे रहिवाशी संघ) हे आहेत. यावेळी चंदगड तालुक्यातून विशेष अतिथी म्हणून पत्रकार अविनाश ढेगसकर (न्यूज रिपोर्टर एबीपी माझा), सुनील कोंडुसकर (चंदगड तालुका प्रतिनिधी, दैनिक सकाळ) व चंदगड तालुक्याचे मुखपत्र चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल तथा सी. एल. न्यूजचे पत्रकार चेतन शेरेगार उपस्थित राहणार आहेत.
    कार्यक्रमाच्या आधी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले असून यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
     मागील अनेक वर्षांत चंदगड तालुक्यातील हजारो बांधव पुणे येथे नोकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षण या निमित्ताने जात असतात. अनेक जण तेथेच स्थायिकही झाले आहेत. तथापि इतक्या वर्षात विविध कामानिमित्त चंदगड तालुक्यातील पुणे येथे जाणाऱ्या नागरिकांना काही वेळ थांबण्यासाठी हक्काचे ठिकाण नाही. ही उणीव येथील रहिवासी संघटनेला सतावत आहे. यातूनच शासन स्तरावरून तसेच तालुक्यातील नागरिकांच्या सहकार्यातून पुणे येथे चंदगड भवन उभारण्याची धडपड रहिवासी संघातील सदस्यांनी सुरू ठेवली आहे. या सर्वांनी 'एकच ध्यास पुणे येथे चंदगड भवन' हे घोषवाक्य घेऊन वाटचाल सुरू ठेवली आहे. या प्रयत्नांना राजकीय बळ मिळेल अशी अपेक्षा संघाच्या सदस्याने व्यक्त केली आहे.
          या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे रहिवाशी संघाचे पदाधिकारी मारुती शिट्याळकर, मारुती पाटील, विजय भाऊ गावडे, राजू दत्तू गोरल, सुरेश चंद्रकांत नेसरकर, लक्ष्मण पुंडलिक सावंत, भरमू दत्तू देवण, दत्तात्रय तानाजी जाधव, गजानन मष्णू गावडे, विनोद  संभाजी कडते, अनिल गुंडू दळवी, गोविंद दत्ताराम नाडगोंडा, संतोष विठोबा गावडे, सचिन मारुती मेंगाणे, सुभाष रामू आपटेकर, विनायक गोविंद अमृसकर, गोपाळ तुळशीराम तुप्पट, गोविंद सखाराम नाईक आदी परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment