चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुडिये (ता. चंदगड) येथून तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी गावच्या शिवारातील विहिरीत आढळला. विक्रम नारायण मोहिते (वय - २६, रा तुडये) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत कर्नाटक पोलिसातून मिळालेली हकीकत अशी, विक्रम हा १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी गावातून अचानक बेपत्ता झाला होता. १७ रोजी बिजगर्णी, ता बेळगाव येथील मारुती सुरतकर यांच्या शेतामध्ये त्याचे चप्पल व दुचाकी मिळाली होती. यानंतर त्याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला होता, तथापि तो सापडत नव्हता. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह कावळेवाडी गावचे शेतकरी विजय येळ्ळूरकर यांच्या विहिरीत आढळला. तो उद्यमबाग- बेळगाव येथील एका कारखान्यात नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची वर्दी विक्रम चे नातेवाईक लुमाना नारायण मोहिते राहणार तोडगे यांनी वडगाव बेळगाव पोलिसात दिली आहे.
No comments:
Post a Comment