रामपूर येथील जवानाचा कर्तव्यावर असताना दिल्ली येथे अपघाती मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2024

रामपूर येथील जवानाचा कर्तव्यावर असताना दिल्ली येथे अपघाती मृत्यू

राजेंद्र गोपाळ कांबळे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     सेवा बजावत असताना राजेंद्र गोपाळ कांबळे (वय ३६) या चंदगड तालुक्यातील रामपूर येथील जवानाचा दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना काल दिनांक २२ रोजी दुपारी घडली. शहीद राजेंद्र कांबळे यांचे पहिलीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण रामपूर येथील प्राथमिक शाळा व हायस्कूल मध्ये झाले होते. २००६ मध्ये तो भारतीय सैन्यात भरती झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.

   त्याचा मृतदेह खास विमानाने बेळगाव येथे आणण्यात येत आहे. त्याच्यावर मंगळवारी सकाळी रामपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून याबाबतची तयारी रामपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत आहेत. या घटनेने गाव व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment