ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे: प्रा. डॉ. जरळी, हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2024

ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे: प्रा. डॉ. जरळी, हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

 


चंदगड / प्रतिनिधी

    'ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची माहिती घेणे तसेच त्या वस्तूची सत्यता पडताळून पाहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. बाजारपेठेमध्ये आपली फसवणूक होऊ नये. या गोष्टीपासून सावध राहा. वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होत असताना आज आपल्याला दिसते. त्यामुळे योग्य ती खबरदारी आपण घेऊन इतरांनाही सक्षम बनवणे गरजेचे आहे.' असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी केले. 

     राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर राजेश घोरपडे, प्रा. एस. डी. तावदारे, प्रा. जी. जे. गावडे, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. एम. एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    प्रास्ताविक प्रा. जी. पी. कांबळे यांनी केले. सर्वांचे स्वागत प्रा. व्ही. डी. पाटील, डॉ. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. एम. एन. पाटील यांनी केले. प्रा. एस. डी.  तावदारे  बोलताना म्हणाले 'ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आपण कोणती वस्तू खरेदी करत आहोत आणि त्या वस्तूबद्दल माहिती असल्याशिवाय खरेदी करू नये तसेच खरेदी केल्यानंतर त्याची पावती आपणाकडे असणे गरजेचे आहे कारण काही समस्या उद्भवल्यास पावतीच्या आधारे न्याय मागता येतो.'

        नॅक समन्वयक डॉ राजेश घोरपडे म्हणाले , 'आपण ग्राहक म्हणून सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे. कारण विविध क्षेत्रांमध्ये विविध वस्तूंची सेवांची खरेदी आपण करत असतो. त्यातून मिळणारे फायदे तसेच त्या वस्तूंची शाश्वता याची पडताळणी करून घ्यावी'  अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर म्हणाले 'ग्राहकांच्या संरक्षणासाठी विविध नियमावली आहे. तसेच अनेक कायदे अमंलात आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने सर्व ती काळजी घ्यावी. आपली फसवणूक करून घेवू नका.' यावेळी महाविदयालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनाली केरकर हिने सुत्रसंचालन केले तर प्रा. जी. जे. गावडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment