चंदगड : सी एल वृत्तसेवा
राज्य परिवहन मंडळाच्या चंदगड आगारामध्ये शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते २ पर्यंत प्रवासी राजा दिन तर दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे २७ डिसेंबर रोजी होणार होता. परंतु काही प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने या तारखेत बदल करण्यात आला आहे. दि ३ रोजी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रवासी, प्रवासी संघटना व सर्व तक्रारदार यांच्या एसटी महामंडळाशी निगडित काही तक्रारी असतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी बाबत समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी निवेदन कार्यक्रमापूर्वी स्वीकारून त्यासंबंधी तात्काळ निर्णय देण्यात येणार आहे. अशी माहिती सतीश पाटील आगार व्यवस्थापक चंदगड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. वरील नमूद तारीख व वेळेत प्रवासी प्रवासी, एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून दोन्ही कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment