चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठे लगत असलेल्या नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. उस्मान खाजाउद्दिन बागवान वय ५३ मूळ रा. हलकर्णी ता. चंदगड सध्या रा. कोवाड असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची वर्दी वशिम मगदूम खानापुरे धंदा गवंडीकाम रा. कोवाड यांनी चंदगड पोलिसात दिली.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, यातील वर्दीदार खानापुरे यांचे मामा उस्मान बागवान हे कामानिमित्त बाहेर जाऊन येतो असे सांगून २१/ १२/२०२४ रोजी बाहेर निघून गेले होते. त्यांची शोधा शोध केली असता त्यांचा मृतदेह ताम्रपर्णी नदीवरील घाटाजवळ सकाळी पालथा पडलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक चौकशी करून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस फौजदार सावंत यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment