चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे जमीन वादातून भात पिकाची चोरी करणे व मारहाण केल्याबद्दल चौघांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मारुती आत्माराम पाटील (वय ५९ राहणार कडलगे बुद्रुक) यांनी पोलिसात दिली आहे. ही घटना कडलगे येथील कामत नावाच्या शेतात २९ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. याबाबत २२ डिसेंबर रोजी संशयित आरोपी यल्लाप्पा उर्फ रानबा परशराम कुट्रे, अरुण शंकर कुट्रे, संजय सुरेश बिर्जे, शुभांगी शंकर कुट्रे सर्व राहणार कडलगे बुद्रुक तालुका चंदगड यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(२), ११५(२), ३५१(२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी घटनेतील फिर्यादी मारुती याने आपल्या ताब्यातील जमीन गट नंबर ११२३ ब मधील चार एकर जमिनीत भात पीक केले होते. त्यापैकी अर्ध्या भागातील भाताची लोंबे कापून जबरदस्तीने चोरून नेत असताना फिर्यादी यांनी आरोपींना भात पीक आम्ही केले आहे. तुम्ही घेऊन जाऊ नका असे सांगत असताना वरील चारही आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत विळा दाखवून जमीन आमच्या मालकीची आहे आलास तर तुला जीवन सोडणार नाही, मुंडके उडवीन अशा प्रकारची धमकी व वादावादी केली. यावेळी फिर्यादी यांची पत्नी, भावजय व पुतणी यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचे भात जबरदस्तीने चोरून नेले. अशी चंदगड पोलीस ठाणे येथे नोंद झाली आहे. गुन्ह्याची एक प्रत कोर्टात दिली असल्याचे समजते. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर भिंगारदिवे करत आहेत.
No comments:
Post a Comment