कु. संयोगिता गणपती बाचुळकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील कु. संयोगिता गणपती बाचुळकर हिची नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा बल (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) मध्ये निवड झाली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी देश सेवेच्या अशा क्षेत्रात दाखल झाल्यामुळे कागणी गाव व परिसरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तिचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कागणी व ग्रामीण भागात झाले. त्यानंतर तिने संरक्षण दलाच्या सेवेत जाण्याच्या उद्देशाने बेळगाव येथील कर्नाटक कोचिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण घेतले. तिला या कामी आई-वडील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन तर कागणी येथील सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन दशरथ मुरकुटे, विष्णू बेळगावकर, यल्लापा पाटील, भगवान कलागते, कृष्णा पाटील, बाळू बांडगे, पुरूषोत्तम सुळेभावकर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment