चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"माझ्या राजकिय व सामाजिक कार्याचा शुभारंभ न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड च्या छत्रपती शिवाजी क्रिडांगणावरून झाला. त्यामुळे या शैक्षणिक संकुलातील समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द आहे.याच क्रिडांगणाने अनेक खेळाडू घडविले. खेळामुळे शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्य सदृढ बनते. आज पर्यंत तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या विद्याथ्यांच्या दळण वळणाची समस्या प्रामुख्याने सोडविणार आहे." असे प्रतिपादन चंदगड तालुक्याचे नुतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले.ते दि न्यू इंग्लिश स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उद्गाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. व्ही. आर. बांदिवडेकर होत्या.यावेळी आमदार पाटील यांनी विद्यालयात धनगर वाड्या वरून येणाऱ्या विद्यार्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक विश्वास पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला प्राचार्य एन. डी. देवळे, शांताराम पाटील, दिपक पाटील, ॲड. आर. पी. बांदिवडेकर, टी. एस. चांदेकर, डॉ. एस. डी. गोरल, शंकर मनवाडकर, मायाप्पा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे तर आभार टी. व्ही. खंदाळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment