गडहिंग्लज येथे मानाचा दिनकर मास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्नीक स्वीकारताना बी. एन. पाटील
कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडीचे मराठी विषयाचे अध्यापक बी एन पाटील यांना डी के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'दिनकर मास्तर सर्जनशील पुरस्कार'नुकताच प्रदान करण्यात आला. गडहिंग्लज येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी एम. खर्डेकर यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बी. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती सचिन राबवलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व साहित्यिक चळवळ वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. श्रीमती उर्मिलादेवी श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी रायकर, सायबर महाविद्यालयाचे प्रेसिडेंट डॉ रणजीतसिंह शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, कोजिमाशीचे संचालक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनकर मास्तर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात असल्याने या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे' असे विचार जेष्ठ वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. तानाजी चौगुले, उपाध्यक्ष क्रांती शिवणे, सचिव श्री सुभाष सुतार व खजिनदार शिवानी पेडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment