बीड : सी. एल. वृत्तसेवा
बीड जिल्ह्यातील पत्रकार मित्र प्रकाश मुंडे यांचे जेष्ठ चिरंजीव राहुल यांचा काही दिवसांपूर्वी चाकण, आळंदी रोडवर अपघात झाला होता. मोशी पुणे येथील अकॉर्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना जखमी राहुल यांचे दुखःद निधन झाले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल सोळंके आदींनी आपले सहकारी प्रकाश मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांचे व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मुंडे कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे केज तालुकाध्यक्ष विजय आरकडे, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, सहसचिव सुहास चिद्रवार, सचिव गौतम बचुटे व झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चौरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment