चंदगड / प्रतिनिधी
रामपूर (ता. चंदगड) येथील रहिवासी श्रीमती शेवंता जोतिबा वरपे यांच्या ९६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वि. मं. बेरडवाडा (वरगांव) शाळेतील ३० विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. कु. साहील व सायली बाबुराव वरपे यांचे सौजन्यांने दाटे केंद्राच्या केंद्रप्रमुख शोभाताई देसाई, दाटे ग्रामपंचायतचे सरपंच किरण नाईक, शालेय कमिटी अध्यक्ष महादेव नाईक, माजी सरपंच आप्पाजी नाईक, गुडेवाडी वि. मं. चे मुख्याध्यापक एन. एस. पाटील, गोपाळ गावडे (पाटील), पालक व शा. व्य. समिती सदस्य उपस्थितीत संपन्न झाले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी करताना- ज्या आई-वडीलांमुळे आपण मोठे झालो. त्यांचे ऋण सदैव जपणे आपले कर्तव्य असलेचे सांगितले. केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांनी बाबुराव वरपे सरांनी आपल्या आईचा वाढदिवस शालेय मुलांना स्पोर्ट्स किट देवून साजरा करणे. पालक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे सारखा आहे. वि. मं. गुडेवाडी शाळेचे मुख्या. नरसू पाटील सरपंच किरण नाईक यांनीही कौतूक केले. आभार विलास सुतार यांनी मानले.
No comments:
Post a Comment