मागील आठवड्यात परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घाटात एसटी बससह जाऊन रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी एसटी वाहतुकीस कोणताच धोका नसल्याने हिरवा कंदील दाखवला होता. तरीही अखेर माशी शिंकलीच. |
दोडामार्ग : सी एल वृत्तसेवा
गेल्या सहा महिन्यापासून तिलारी घाटातून बंद असलेल्या बसेस सुरू झाल्या पाहिजे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. रस्ता वाढवला, दोन वेळा पाहणी झाली. परिवहन अधिकाऱ्यांनी अनुकुलता दाखवली. बस सेवा सुरू होणार ठरले. तरीही अखेर माशी शिंकली. याला कारणीभूत ठरली सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड ची दिरंगाई.
घाटात पावसाळ्यात एका ठिकाणी संरक्षण भिंत ढासळली आहे. ही दुरुस्ती आवश्यक मिरर वळणावर बसवावे याची पुर्तता करावी. यावर एस टी अधिकारी ऐनवेळी आडून बसले. बांधकाम दुरुस्ती वेळेत न झाल्यामुळे ही नामुष्की पुन्हा ओढवली आहे. बांधकाम विभाग कोल्हापूर दक्षिण विभाग यांनी २३ जानेवारी २०२५ पर्यंत काम पूर्ण न केल्यास२४ रोजी तिलारीनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग यांना नुकतेच देण्यात आले. तिलारी घाटातून जिल्हाधिकारी यांनी घातलेल्या बंदीची मुदत संपली आहे. त्यामुळे बसेस सुरू करा यासाठी तीन महिने प्रयत्न सुरू आहेत. उपोषण, रास्ता रोको आंदोलन झाले, घाटातील धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या. पण काही उपयोग झाला नाही.
जुलै २०२४ मध्ये घाटात अतिवृष्टीमुळे किमी १५७/९०० मध्ये घाट उतरताना उजव्या बाजूला संरक्षक भित खचलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी अवघड वळणांवर पुर्ण झाडी वाढलेली आहेत. त्याच बरोबर वळणावर ब्लाईंड स्पॉटच्या ठिकाणी आवश्यक मिरर व योग्य त्या उपाय योजना कराव्यात तसेच सुचना फलक लावावे जेणेकरुन अपघात होणार नाहीत. वरील सर्व बाबींची पुर्तता २३ जानेवारी पर्यंत व्हावी व तसे पत्र महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ कोल्हापुर यांना देण्यात यावे. आपल्याकडून होणा-या दिरंगाईमुळे एस.टी. वाहतूक सुरु होणेस विलंब होत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. भितींचे बांधकाम व इतर उपाय योजनांची पुर्तता न झाल्यास २४ जानेवारी २०२५ रोजी तिलारीनगर येथे आपले विरोधात रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल व उपोषणा दरम्यान उद्भवणा-या परिस्थीतीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल. असे निवेदनात प्रविण गवस यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment