तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी अशोक लक्ष्मण चव्हाण (वय ६०) या शेतकऱ्याचा निट्टूर तलाव क्रं. २ मध्ये पाण्यातील मोटारीची केबल दुसऱ्या बाजूला नेत असताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात संतोष पुंडलिक पाटील यांनी कोवाड पोलीसात वर्दी दिली आहे. चंदगड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसात कोवाड येथील ताम्रपर्णी नदीत बुडून एक जण तर ढेकोळेवाडी येथील शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर ही तिसरी घटना घडली आहे. या शिवाय काल किणी येथील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. तर चार दिवसांपूर्वी रामपूर येथील जवानाचा दिल्ली येथे अपघातात मृत्यू झाला. वर्षाच्या अखेरीस अपघाती मृत्यूच्या घटनांंत कमालीची वाढ झाली आहे.
तेऊरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृत्यू बाबत कोवाड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवार दि. २७/१२/२०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास मयत अशोक लक्ष्मण चव्हाण हे निट्टूर तलावाकडे गेले होते. तलाव नं. २ च्या पाण्यावर त्यांच्या मालकिची ऊस शेती आहे. येथेच ब्रम्हदेव पाणीपुरवठा संस्था तेऊरवाडी या संस्थेने मोटरपंप बसवुन शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला आहे. मयत अशोक चव्हाण हा आपले हाताला दोरी बांधुन तलावात पाणी केवढे आहे, हे पाहण्यासाठी तसेच सदर मोटरीची केबल दुसरीकडे नेणेसाठी पाण्यात उतरला. तथापि पाणी खूप खोल असल्याने या पाण्यात बुडुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत संतोष पुंडलिक पाटील यांनी वर्दी दिलेने वरीलप्रमाणे मयत दाखल करुन सदर ठिकाणी प्राथमिक तपासाकरीता पोहेकों भारती यांना रवाना केले. मयताचा पुढील तपास मा.पोनि यांचे आदेशाने पो.हे.कॉ जमिर मकानदार करत आहेत. मयत अशोक चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मूलगा, मूलगी व सून असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment