चंदगड : सी एल वृत्तसेवा
सातवणे (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर रित्या विकणाऱ्या एकावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे नोंद झाला आहे संभाजी सुभाना पारसे वय ४६ असे दारू विकणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तुकाराम राजीगरे पोहेकॉ यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सातवणे येथील सुभाना पारसे हा २५ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे गोवा बनावटीच्या गोल्डन आईस व्हिस्की च्या बाटल्या घेऊन विक्री करत होता. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्याच्याकडे ४८००/- रुपयांचा मुद्देमाल सापडला. यावरून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई 90 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अहवालाची प्रत न्यायालयात सादर केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ कांबळे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment