कुदनूर केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा, लहान गटात कुदनूर तर मोठ्या गटात दिंडलकोप शाळेचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2024

कुदनूर केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा, लहान गटात कुदनूर तर मोठ्या गटात दिंडलकोप शाळेचे यश

कुदनूर केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा, लहान गटात कुदनूर तर मोठ्या गटात दिंडलकोप शाळेचे यश

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कोल्हापूर जिल्हा पकुदनूर केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा, लहान गटात कुदनूर तर मोठ्या गटात दिंडलकोप शाळेचे यशरिषद व पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. चंदगड तालुक्यातील कुदनूर केंद्रांतर्गत या स्पर्धा नुकत्याच केंद्र शाळा कुदनूर येथे पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन गावच्या सरपंच संगीता सुरेश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कुमार शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर गवंडी, कन्या शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिग्विजय खवणेवाडकर उपस्थित होते. दीप प्रज्वलन केंद्रप्रमुख आर आर पाटील यांनी केले. प्रस्ताविक केंद्र मुख्याध्यापक यादू मोदगेकर यांनी केले.
   स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या शाळा पुढील प्रमाणे. *कनिष्ठ गट* समूहगीत- प्रथम कन्या विद्यामंदिर कुदनूर, द्वितीय क्रमांक विद्यामंदिर राजगोळी खुर्द, समूह नृत्य- प्रथम कन्या शाळा कुदनूर, द्वितीय राजगोळी खुर्द, नाट्यीकरण- प्रथम क्रमांक केंद्र शाळा कुमार कुदनूर, द्वितीय क्रमांक विद्यामंदिर राजगोळी खुर्द, कथाकथन- प्रथम क्रमांक केंद्र शाळा कुमार कुदनूर द्वितीय विद्यामंदिर राजगोळी खुर्द, प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक केंद्रशाळा कुमार कुदनूर, द्वितीय कन्या शाळा कुदनूर.
   *वरिष्ठ गट* समूहगीत- प्रथम क्रमांक विद्यामंदिर राजगोळी खुर्द, द्वितीय क्रमांक विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, समूह नृत्य- प्रथम क्रमांक विद्यामंदिर दिंडलकोप, द्वितीय क्रमांक राजगोळी खुर्द, नाट्यीकरण- स्पर्धा प्रथम क्रमांक विद्यामंदिर दिंडलकोप, द्वितीय क्रमांक राजगोळी खुर्द, कथाकथन- प्रथम क्रमांक विद्यामंदिर दिंडलकोप, द्वितीय क्रमांक विद्यामंदिर राजगोळी बुद्रुक, प्रश्नमंजुषा- प्रथम क्रमांक विद्यामंदिर दिंडलकोप, द्वितीय क्रमांक राजगोळी बुद्रुक. 
    स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यांना चंदगड तालुकास्तरावरील स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
   स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दस्तगीर उस्ताद, मारुती राजगोळे यांनी मनोगते व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माया पाटील, प्रकाश देसाई, राजू डोणकरी. बा. न. पाटील, देवानंद पाटील, क. पा. पाटील, सरोजिनी पाटील, आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रमिला कुंभार यांनी केले तर सुखदेव भातकांडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment