चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्यांक हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपस्थित होते.
महाविद्यालयातील अल्पसंख्यांक विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी या कार्यक्रमा मागचा हेतू व उद्देश आपल्या प्रास्ताविकातून अल्पसंख्यांक विभाग प्रमुख प्राध्यापक ए एस बागवान यांनी स्पष्ट केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा एन के जावीर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत डॉ एम व्ही जाधव यांनी केले. आपल्या मनोगतात बोलताना प्रा. एन के जावीर म्हणाले, 'अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहात येऊन आपली उन्नती करावी व शासनाच्या विविध सुविधा आणि योजना यांचा लाभ घ्यावा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन प्रगती करावी.'
अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ बी डी अजळकर म्हणाले, सर्वांनी मोबाईलचा वापर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या माहितीचा शोध शासनाच्या विविध संकेत स्थळांवर घेण्यासाठी करावा. आपली शैक्षणिक उन्नती करावी नेहमी ध्येयाचा पाठलाग करावा.
यावेळी व्यासपीठावर नॅक समन्वयक डॉ आर ए घोरपडे, प्रा. ए एस जाधव, डॉ व्ही व्ही कोलकार, प्रा. अनंत कलजी, प्रा. डॉ आय आर जरळी, प्रा. जी पी कांबळे, डॉ ए व्ही दोरुगडे, प्रा. जी जे गावडे, डॉ जे पी पाटील, प्रा. पी ए पाटील, सी ए पाटील, श्रीपतराव कांबळे, संजय कांबळे, ए ए मकानदार आदी मान्यवर तसेच प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ एम व्ही जाधव यांनी मानले.
No comments:
Post a Comment