चंदगड / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धामध्ये चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मोहम्मद कैफ शेरखान, (बीएससी भाग तीन) याने 73 किलो वजनी गटात ३८० किलो वजन उचलून कास्यपदक पटकावले. तर कुमारी कविता परब (बीकॉम भाग 3) हिने ७६ किलो वजनी गटात 210 किलो वजन उचलून कास्य पदक पटकावले. यापूर्वीही सदर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल वरील खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment