श्रेयस पाटील |
चंदगड : सी एल वृतसेवा
जिद्द व चिकाटीच्या जोरावर धुमडेवाडी (ता चंदगड) येथील श्रेयस पाटील याची भारतीय वायुसेनत अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिसऱ्या प्रयत्नात हे यश त्याला प्राप्त झाले. चंदगड सारख्या दुर्गम भागातून हे यश मिळविणे कौतुकास्पद आहे. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून निवड झालेला चंदगड तालुक्यातील तो पहिलाच तरुण असावा.
विवेक इंग्लिश मिडीयम येथे श्रेयसचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठवडगाव येथे सीबीएससी माध्यमातून झाले. एनडीए साठी दोन वेळा पात्र होऊन सुद्धा श्रेयसला यश मिळत नव्हते. म्हणून त्याने पुणे येथे माहिती तंत्रज्ञान (IT) अभियांत्रिकी हा अभ्यास क्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने एनडीए मध्ये भरती होण्याची पूर्ण तयारी केली व म्हैसूर येथे झालेल्या एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट परीक्षा व बंगलोर येथे झालेल्या वैद्यकिय परीक्षेत यश मिळविले. नुकत्याच जाहिर झालेल्या ऑल इंडिया मेरिट लिस्ट मध्ये श्रेयसने स्थान पटकावले असून पुढील प्रशिक्षणासाठी भारतीय एअर फोर्स अकॅडमी हैद्राबाद येथे १ जानेवारी पासून रुजू होत आहे. तालुक्यातून वायुदलात क्लासवन अधिकारी पदावर रुजू होण्याचा मान मिळवणारा बहुदा तो पहिलाच असावा. त्याच्या या यशात वडील राजीव पांडूरंग पाटील (आर. पी.) व आई अनिता राजीव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. श्रेयसच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment