कष्टाच्या सातत्यातच यशाचा पाया - गोपाळराव पाटील, हलकर्णी महाविधालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2024

कष्टाच्या सातत्यातच यशाचा पाया - गोपाळराव पाटील, हलकर्णी महाविधालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


चंदगड / प्रतिनिधी
      जर विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन लाभले व त्या मार्गदर्शनाच्या आधारे कष्टामध्ये सातत्य ठेवले तर यश मिळवणे फार सोपे होते विद्यार्थ्यांची मेहनत हीच त्यांच्या आयुष्याला आकार देत असते भविष्यात याच विद्यार्थ्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.' असे मत दौलत विश्वस्त संस्थेचे  मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले. हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ तसेच गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयास माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
      यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील, प्राचार्य डॉ बी डी अजळकर ,उपप्राचार्य प्रा आर बी  गावडे व आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी ए बोभाटे यांनी केले. 
यावेळी महाविद्यालयातील यश स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी कुमार तुषार तानाजी पाटील याची आयटीबीपी मध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रतीक प्रकाश पाटील याची बीएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार व सन्मान करण्यात आला. 
शिवाजी विद्यापीठामार्फत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पॉवर लिफ्टिंग अंतर विभागीय स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कु.अर्पिता वरपे, कु.दीक्षा जाधव , कु. सोनाली पाटील व कु. स्वाती उंबळकर या विद्यार्थिनींनी अनुक्रमे सुवर्ण पदक, रौप्य पदक, काश्य पदक, काश्य पदक अशी पारितोषिक प्राप्त केली त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला . तसेच महाविधालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत पोतदार यांच्या समिक्षा ग्रंथास पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.  संस्थेचे उपाध्यक्ष मा. संजय  पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे  उपस्थित होते. दौलत विश्वस्थ संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सचिव विशाल पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. कैवल्य काळे, प्रा. सी. एम. तेली महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचालन  प्रा. पी. ए.  बोभाटे यांनी केले तर आभार डॉ. सी. बी. पोतदार यांनी मानले.

No comments:

Post a Comment